~ 6 Comments

पेजरॅंक म्हणजे काय रे भाऊ?

महेंद्र कुलकर्णी म्हणजेच महेंद्र काका म्हणजेच MK (हे नाव मी दीले आहे !) काय वाटेल ते लिहितात. ("काय वाटेल ते" हा ब्लॉग लिहितात.) गेल्या आठवड्यात महेंद्र काकांनी पेजरँक या विषयावर लेख लिहिला. (काका समदं तुमीच लिवायला लागलात तर आमी गरीबांनी जायाचं कुठं? ) आणि मला या विषयावर अजुन माहिती देणारी पोस्ट लिहायला सांगीतली. काकांची आज्ञा शिरसावंद्य मानुन मी पेजरँक बद्दल माहिती देणारी पोस्ट लिहायला घेतली सुद्धा !( काका Thank you एक विषय सुचविल्याबद्दल :-)


दहा महिन्यांपुर्वी एक वेबसाईट सुरु करण्याचा विचार मनात घेउन मी गुगलवर प्रचंड शोधकाम केले. वेब होस्टींग, वेब डीझाइनींग बद्दल वेड्यासारखे वाचन केले. खरेतर एका वेगळ्याच विषयाची वेबसाईट बनवायची होती मात्र बनविली "नेटभेट". आता गणपतीचा मारुती झाला की मारुतीचा गणपती हे तुम्हीच ठरवा. या दरम्यान मी वेब डीझाईन, ब्लॉगींग, अ‍ॅडसेन्स, SEO अशा अनेक विषयांचा अभ्यास केला. पेजरँक बद्द्लही बरेच काही वाचलं होते.


पेजरँक हा शब्दच मुळात गुगल काकांनी प्रथमतः वापरला आणि आजही पेजरँक हे नाव आणि ट्रेडमार्क गुगलच्या मालकीचे आहे. गुगलवर येणारे शोध परीणाम (search results) सुधारण्यासाठी गुगलकाकांनी पेजरँक वापरायला सुरुवात केली.
प्रत्येक वेबसाईटला गुगल १ ते १० पैकी गुण देते. जेवढे गुण जास्त तेवढा पेजरँक चांगला. पेजरँक ठरवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंक्स (inbound links).

लाखो वेबसाईट्स मधुन सर्च करुन गुगल रीझल्ट्स देते खरी मात्र या रीझल्ट्सची क्रमवारी ठरवणे कठीण असते. गुगलने यासाठी लोकशाहीत वापरल्या जाणार्‍या मतदान पद्धतीचा वापर केला. एका वेबसाईटने दुसर्‍या वेबसाइटला लिंक केले म्हणजेच आपले मत दीले असे गुगलचे अल्गोरीदम गृहीत धरते. मात्र फक्त एकुण मतांची संख्या लक्षात न घेता मत देणार्‍या वेबसाईटची गुणवत्ता देखील पाहीली जाते. म्हणजेच जर वेबपेज अ चा पेजरँक ५ आहे आणि वेबपेज ब चा पेजरँक १ आहे तर वेबपेज अ ने दीलेल्या लिंकचे महत्त्व वेबपेज ब ने दीलेल्या लिंकपेक्षा खुप जास्त असेल. थोडक्यात सांगायचे तर जेवढा जास्त पेजरँक तेवढे त्या वेबसाईटचे महत्त्व गुगलच्या नजरेत जास्त.

मात्र फक्त inbound links ची संख्या मोजुन पेजरँक ठरवला जातो असे नाही. एका गुंतागुंतीच्या फॉर्म्युल्याद्वारे पेजरँक ठरवला जातो. वेबपेजवर नविन माहीती उपलब्ध करुन देण्याची वारंवारता (Frequency of posting), शोधशब्दाची समर्पकता, आणि वेबसाईटच्या नियमीत वाचकांची संख्या या व ईतर अनेक महत्त्वाच्या बाबी पेजरँक ठरवण्यासाठी महत्त्वाच्या असतात.


बहुतेक सर्व मराठी ब्लॉगर्स marathiblogs.net या साईटवर नोंदणी करतात व marathiblogs.net चे विजेट आपल्या ब्लॉग वर लावतात. असे विजेट चिकटवणे हा लिंकींगचाच एक प्रकार आहे. याचाच अर्थ असा की marathiblogs.net ला सर्वाधीक inbound लिंक्स  मिळाल्या आहेत मात्र तरीही marathiblogs.net आणि kayvatelte.wordpress.com या दोनही ब्लॉग्जचा पेजरँक सारखाच म्हणजे ५ एवढा आहे. याचे एकमेव कारण म्हणजे marathiblogs.net वर स्वतःचे असे आशयपुर्ण लेखनच नाही आहे.


पेजरॅंक वाढवण्यासाठी SEO म्हणजेच सर्च ईंजिन ऑप्टीमायझेशन एक्स्पर्ट्स बर्‍याच युक्त्या सांगतात. पण त्यापैकी किती खर्‍या किती खोट्या हे फक्त गुगल काकांनाच ठाउक.  सर्व मराठी ब्लॉगर्ससाठी आज मी यापैकीच काही सर्वमान्य आणि विश्वसनीय टीप्स देणार आहे.


१. पेजरँक सुधारण्यासाठी लिंक्सपेक्षाही महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ते म्हणजे ब्लॉगवर केलेल्या लिखाणाची गुणवत्ता (Quality) आणि वारंवारता (Frequency). नविन आणि इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारचे (Unique) लेखन दररोज करत रहा. ब्लॉगवरचे लिखाण चांगले असेल तर वाचक आपोआप परत येतील. पेजरँक वाढण्यासाठी ट्रॅफीक (वाचकांची संख्या) वाढणे अत्यावश्यक असते.


२. विविध फोरम्स (Forums) वर होणार्‍या चर्चांमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या ब्लॉगची लिंक तेथे देण्यास विसरु नका. यामुळे ट्रॅफीक आणि inbound links वाढण्यास मदत होइल. Netbhet Forum वर तुमचे ब्लॉगींगविषयक किंवा अन्य प्रश्न ब्लॉगलिंक्स सहित विचारल्यास किंवा forum वरील चर्चेत सहभागी झाल्यास पेजरँक वाढाण्यास मदत होइल.


३.ब्लॉग कमेंट्स मध्ये दीलेल्या लिंक्स SEO साठी गृहीत धरल्या जातात की नाही याबद्दल तज्ञांमध्ये दुमत आहे. माझ्यामते ब्लॉगर आणि वर्डप्रेस या दोनही मुख्य ब्लॉगसर्वीसमध्ये कमेंट्स गुगलच्या सर्च इंजिन्समध्ये समाविष्ट केले जात नाहीत. (मी काही ब्लॉगस्पॉट ब्लॉग्जमध्ये मात्र कमेंट्स इंडेक्स झालेल्या पाहिल्या आहेत. मात्र त्या संबंधीची युक्ती अजुन कळलेली नाही.) आणि म्हणुनच मी नेटभेट साठी Disqus comments हा पर्याय निवडला आहे. Disqus वर दीलेल्या कमेंट्स या एका स्वतंत्र वेबपेजच्या स्वरुपात साठवल्या जातात आणि गुगल सर्च मध्ये समाविष्ट केल्या जातात.  म्हणजेच नेटभेट वर दीलेल्या कमेंट्स आणि सोबत तुमच्या ब्लॉगची लिंक पेजरँक वाढवीण्यास मदत करेल.


४. सर्च इंजिन्सना आपल्या ब्लॉगवरील मजकुर सहजगत्या शोधता यावा म्हणुन ब्लॉगचा साईटमॅप तयार करुन घ्यावा. गुगल साठी हा साईटमॅप XML फॉरमॅट मध्ये असतो. साईटमॅप बनविण्यासाठी येथे क्लिक करा. आणि येथे क्लिक करुन गुगल व ईतर प्रमुख सर्च इंजिन्सवर साईटमॅप सबमिट करा.


५. आणि सर्वात शेवटची व महत्त्वाची टीप म्हणजे इतर ब्लॉगर्सबरोबर लिंक एक्स्चेंज करा. ब्लॉगरोल मध्ये लिंक्स देउन किंवा विजेट्स लावुन लिंक एक्स्चेंज करता येतात. (नेटभेटचं विजेट येथे साईडबारवर तयार ठेवलं आहे :-))

मित्रांनो पेजरँक, SEO हे अतिशय रंजक विषय आहेत. आता मी जी माहिती दीली ती तर अगदीच प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाला मिळणारे प्रतिसाद पाहुन नंतर अजुन सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करेन.


तुमच्या प्रतीक्रीया नक्की कळवा.

Image credit

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

6 Responses to "पेजरॅंक म्हणजे काय रे भाऊ?"

  1. gravatar
    Unknown 5 October 2013 at 22:31 Permalink

    नमस्कार
    तुमच्या या लेखाने खूप मदत झाली. SEO, keyword research, traffic या विषया वर तुमच्या कडून अजून माहित मिळेल अशी अपेक्षा मी करतो. धन्यवाद

  2. gravatar
    Anonymous 20 March 2014 at 02:44 Permalink

    मराठी ब्लॉग लिस्ट -
    marathibloglist.blogspot.in

  3. gravatar
    Shashikant Jadhav 1 September 2014 at 05:22 Permalink

    how to create sitemap for my blog?

  4. gravatar
    idris salhe 7 October 2015 at 01:57 Permalink

    I would like to post this article on my own blog

  5. हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)

  6. gravatar
    Amit 19 April 2016 at 03:54 Permalink

    ek number blog ahe tumcha sir khup chan post astat i like it

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख