~ 0 Comments

Create beautiful Tag clouds for your blogs.


मित्रहो, ब्लॉगची विषयसूची वाढत गेली तर वाचकांना सर्व किंवा मुख्य विषयांवरील लेख शोधणे आणि वाचणे कठीण होत जाते. यासाठीचा सर्वोत्तम उपाय म्हणजे "टॅग क्लाउड" म्हणजेच शब्दांचे ढग. टॅग क्लाउड मध्ये ब्लॉगवरील मुख्य विषयांच्या लिंक्स वाचकांना सहजगत्या पाहता येतील अशा प्रकारे मांडलेल्या असतात. सर्वात पॉप्युलर लिंक्स मोठ्या अक्षरात (फाँट्स) असतात आणि विषयांच्या संख्येनुसार लहान होत जातात.
टॅग क्लाउड बनवुन देणार्‍या अनेक वेबसाईटस अस्तीत्वात आहेत तसेच ब्लॉगर.कॉमनेही नुकताच ही सुविधा उपलब्ध करुन दीलेली आहे. आज मी एका अशा वेब अप्लिकेशनबद्दल सांगणार आहे जे फक्त टॅगक्लाउड बनवण्यापर्यंतच मर्यादीत नसुन टॅग क्लाउडला ब्लॉगला अनुसरुन सजवण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देते.
या वेब अप्लिकेशनचे नाव आहे www.tag-cloud-generator.com/ (टॅग क्लाउड जनरेटर.कॉम)


टॅग क्लाउड जनरेटर.कॉम कसे वापरावे ?
  1. टॅग क्लाउड जनरेटर वापरण्यास अतीशय सोपे आहे.
  2. www.tag-cloud-generator.com/ ला भेट द्या.
  3. ज्या ब्लॉग किंवा वेबसाईट चे टॅग क्लाउड बनवायचे आहे त्याची URL दीलेल्या रकान्यात लिहा आणि Generate या बटणावर क्लिक करा.
  4. आता ब्लॉगचे टॅग क्लाउड तयार होइल आणि त्याचा HTML CODE कॉपी करुन ब्लॉगच्या HTML/Java Script code gadget मध्ये चिकटवा.
टॅग क्लाउड कसे सजवावे?
  • टॅग क्लाउड सजवण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये टॅग क्लाउडचा बॅकग्राउंड कलर, टॅग क्लाउडमधील वेगवेगळ्या लिंक्सचा कलर, एवढेच नव्हे तर बॅकग्राउंड पिक्चर देखील आपल्याला हवे तसे बदलता येते. टेम्प्लेटचा आकार, फाँट्चा आकार, लिंकवर टीचकी मारल्यास साधता येणारा परीणाम (Effects) इत्यादी आपल्या आवडीनुसार दीलेल्या पर्यांयातुन निवडता येते.
www.tag-cloud-generator.com/ च्या सहाय्याने मी बनवीलेले काही टॅग क्लाऊड्स पाहण्यासाठी salilchaudhary.blogspot.com येथे क्लिक करा.

मग भेट द्या www.tag-cloud-generator.com/ आणि आपल्या ब्लॉगला सजवायला सुरुवात करा.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख