~ 0 Comments

Easiest way to add Recent posts and Recent comments on blogger blog


माझ्या ब्लॉगर मित्रांसाठी एक खुश खबर आहे. Recent posts आणि Recent Articles आपल्या (blogger.com) ब्लॉगवर दाखवीण्यासाठीचा सगळ्यात सोपा मार्ग मला मिळाला आहे. मुख्य हा सोपा मार्ग ब्लॉगर.कॉमनेच उपलब्ध करुन दीला आहे.
नुकताच मी "नेटभेट"ची टेम्प्लेट बदलली. नेटभेटवर रीसेंट पोस्टस आणि रीसेंट आर्टीकल्स हे gadgets कसे लावता येतील यासाठी गुगलवर इतरत्र सर्च करताना आढळले की ब्लॉगर.कॉमनेच आता ही सुविधा उपलब्ध करुन दीली आहे. म्हणताता ना "काखेत कळसा आणि गावाला वळसा"
ब्लॉगर.कॉमवर रीसेंट पोस्टस हे gadget कसे वापरावे ?
१. नेहमीप्रमाणे blogger.com वर लॉगीन करा.
२. आता Layout > Page elements वर क्लिक करा.
३. साईडबार वर जिथे हे gadget लावायचे आहे तेथे "Add a gadget" ला क्लिक करा.
४. आता एका नविन विंडो मध्ये सर्व गॅजेट्स दीसु लागतील.
५. चित्रात दाखवील्याप्रमाणे "Featured" गॅजेट्सवर क्लिक करा.
६. येथे दोन "Recent posts" गॅजेट्स दीसतील. यापैकी पहीले गॅजेट काही बेसिक फंक्शन्स पुरवीते आणि दुसर्‍या गॅजेटमध्ये काही अ‍ॅडव्हान्स फंक्शन्स मिळतात.
७. येथे मी दुसर्‍या म्हणजे अधिक अ‍ॅडव्हान्स्ड गॅजेटबद्द्ल माहीती देणार आहे. ते निवडा. (त्यासमोरील + चिन्हावर क्लिक करा)
८. Recent post गॅजेटमधील आवश्यक ते पर्याय निवडा आणि Update वर क्लिक करुन गॅजेट कसे दीसेल ते पहा.
९. आता save बटणावर क्लिक करा.
ब्लॉगर.कॉमवर रीसेंट कमेंट्स हे gadget कसे वापरावे ?
१. नेहमीप्रमाणे blogger.com वर लॉगीन करा.
२. आता Layout > Page elements वर क्लिक करा.
३. साईडबार वर जिथे हे gadget लावायचे आहे तेथे "Add a gadget" ला क्लिक करा.
४. आता एका नविन विंडो मध्ये सर्व गॅजेट्स दीसु लागतील.
५. "Featured" गॅजेट्सवर क्लिक करा.
६. चित्रात दाखवील्याप्रमाणे Recent comments गॅजेटवर क्लिक करा.
७. येथे गॅजेटचे नाव, लांबी, किती कमेंट्स दाखवल्या जाव्यात त्यांची संख्या आणि कमेंट्सची किती अक्षरे दाखवीली जावीत ते निवडा. ८. आता हे गॅजेट सेव्ह करा.
Recent post आणि Recent comments आपल्या ब्लॉगवर दाखवुन ब्लॉगला प्रोफेशनल लुक द्या. रीसेंट पोस्ट आणि कमेंट्स दाखवील्यामुळे ब्लॉगच्या वाचकांना अधिकाधिक मजकुर वाचता येतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त वेळ वाचकांना ब्लॉगवर खिळवुन ठेवता येते.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख