~ 0 Comments

How to add 'Read More' link in Blogger?

[ MARATHI ].......
वर्डप्रेस्.कॉम वरील ब्लॉगमध्ये एक READ MORE ची सुविधा पुरवीलेली आहे. HTML एडीटरमध्ये असलेल्या या सुविधेचा वापर करुन ब्लॉग पोस्टच्या केवळ सुरुवातीचा काही मजकुरच ब्लॉगच्या मुख्यपानावर दाखवता येतो. READ MORE च्या सुविधेचे तीन प्रमुख फायदे आहेत. १. ब्लॉगच्या एकाच पानावर जास्तीत जास्त ब्लॉग पोस्ट दाखवता येतात. त्यामुळे एकाच दृष्टीक्षेपात वाचकांना अधिकाधिक लेखांची माहीती देता येते. २. READ MORE मुळे वाचकांना कमीत कमी वेळेत ब्लॉगवरील जास्तीत जास्त उपयुक्त माहीती मिळवता येते. ३. READ MORE च्या सुविधेचा सर्वाधिक फायदा हा अधिकाधिक जाहीरातीं दाखवण्यासाठी होतो. म्हणजे एकच वाचक ब्लॉगपोस्टच्या सारांशाच्या पानावरील जाहीराती पाहतात आणि READ MORE वर क्लिक केल्यानंतर पुर्ण ब्लॉगपोस्टच्या पानावरील जाहीराती देखील पाहतात. दुर्दैवाने ही अतीशय उपयुक्त सोय ब्लॉगर्.कॉम वर दीलेली नाही. त्यामुळे मारुतीच्या शेपटीसारखे लांबच लांब वाढत जाणारे वेबपेज वाचकांना पहावे लागते. आज मी तुम्हाला READ MORE ब्लॉगर.कॉमच्या ब्लॉगवर कशी वापरावी याची माहीती देणार आहे. खरेतर ब्लॉगर्.कॉमने ही सुविधा दीलेली आहे मात्र ती पडद्याआड लपलेली असते. या पडद्याचे नाव आहे Blogger in Draft. (http://draft.blogger.com/) Blogger in Draft ही ब्लॉगर.कॉमशी संलग्न असलेली साईट आहे. ब्लॉगर.कॉमवर कोणत्याही नव्या सोयी जोडण्याआधी त्यांची चाचणी करण्यासाठी Blogger in Draft वापरली जाते. ब्लॉगर.कॉमवरील ब्लॉगमध्ये READ MORE ची सुविधा कशी वापरावी?
  1. (http://draft.blogger.com/) मध्ये आपल्या गुगल आयडीच्या सहाय्याने लॉग्-इन करा.
  2. येथे ब्लॉगच्या डॅशबोर्डमध्ये नविन पोस्ट लिहा किंवा आधीच लिहिलेल्या पोस्टला संपादीत (Edit post) करा.
  3. ब्लॉग पोस्टचा सुरुवातीचा जेवढा भाग READ MORE च्या आधी दीसावयास हवा तेथे क्लिक करा.
  4. आता खाली चित्रात दाखवील्याप्रमाणे insert jump break या चिन्हावर क्लिक करा.

  5. खाली दाखवेल्याप्रमाणे एक जाड रेषा दीसेल. या रेषेचा वरचा भाग वाचकांना पाहता येइल. व पुढील भाग वाचण्यासाठी READ MORE या लिंकवर क्लिक करावे लागेल.

  6. आता ब्लॉग पोस्ट पब्लिश करा.
तुम्ही नुकताच पब्लिश केलेली ब्लॉग पोस्ट काहीशी अशी दीसेल.
टीप - ब्लॉगर-इन्-ड्रफ्टची ही सुविधा ब्लॉगर.कॉम मध्ये पण हवी असेल तर ब्लॉगर्-इन्-ड्राफ्ट मध्ये लॉग-इन करुन खाली दाखवील्याप्रमाणे "Make Blogger in draft my default dashboard" च्या चेकबॉक्सला सीलेक्ट करा.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख