How to change blogger template?
हॅलो ब्लॉगरफ्रेंड्स,
आज या लेखापासुन मी ब्लॉगरबद्दल सवीस्तर माहीती देणार्या लेखमालिकेची सुरुवात करीत आहे. ब्लॉगर्सना उपयुक्त ठरेल अशी ब्लॉग (Blogger/blogspot) बद्दल सर्व माहीती वाचकांना या लेखमालीकेद्वारे पुरवीण्याचा माझा मानस आहे. "ब्लॉगची टेम्प्लेट कशी बदलावी?" या पासुन मी लेखमालीकेला सुरुवात करीत आहे.
ब्लॉग टेम्प्लेट म्हणजे काय?
ब्लॉग किंवा वेब साईट एका ठरावीक साच्यामध्ये मांडलेली असते. ब्लॉगमध्ये लेख कोठे असणार, विषयसुची, जाहीराती, नावे, परीशीष्टे इत्यादी वेबसाइटवर कोठे आणि कसे दीसणार याची मांडणी टेम्प्लेटमध्ये केलेली असते. अगदी फाँट्सचा रंग आणि आकार देखील टेम्प्लेटमध्ये ठरवलेला असतो.
ब्लॉगर्.कॉम आपल्याला काही टेम्प्लेट्स पुरवीते. या टेम्प्लेट्सना क्लासीक टेम्प्लेट्स असेही म्हंटले जाते. क्लासीक टेम्प्लेट वापरणे बर्याच ब्लॉगर्सना आवडत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे क्लासीक टेम्प्लेट्समुळे ब्लॉगचे स्वतंत्र अस्तीत्व निर्माण होत नाही. आणि आपला ब्लॉग इतर अनेक ब्लॉगपैकी एक बनुन जातो.
पण जर कोणाला क्लासीक टेम्प्लेटपैकीच एखादी टेम्प्लेट आवडली असेल तर ती टेम्प्लेट कशी वापरावी ते आपण पाहुया -
1. ब्लॉगर्.कॉम मध्ये लॉग्-इन करा.
2. तेथे Layout चा ऑप्शन दीसेल. त्यावर क्लिक करा.
3. ले-आउट मध्ये पुढीलप्रमाणे चार पर्याय दीसतील - Page Elements , Fonts and Colors, Edit HTML and
choose new template
4. त्यापैकी "Choose new template" वर क्लिक करा.
5. इथे तुम्हाला क्लासीक टेम्प्लेट्स चे सर्व उपलब्ध पर्याय दीसतील.
6. त्यापैकी तुमचा आवडता पर्याय निवडा आणि "Save template" चे बटण दाबुन नविन टेम्प्लेट सुरक्षीत करा.
7. आता तुम्ही नवीन टेम्प्लेटने सुसज्ज ब्लॉग पाहु शकता.
आता आपण ब्लॉगर टेम्प्लेट्स बद्दल चा महत्त्वाचा आणि रंजक भाग पाहुया. नविन टेम्प्लेट बाहेरुन आणुन (इंटरनेटवरुन) आपल्या ब्लॉगवर कशी जोडावी ते पाहुया. पण त्याआधी ब्लॉगर टेम्प्लेट्सबद्दल काही अधीक माहीती जाणुन घेउया.
नविन ब्लॉगर टेम्प्लेटची काय आवश्यकता? -
याचे उत्तर सोपे आहे. आपला ब्लॉग वेगळा आणि सर्वात उठुन दिसावा यासाठी तसेच काही प्रगत सुविधांचा वापर करता यावा यासाठी नविन ब्लॉगर टेम्प्लेटची आवश्यकता भासते.
ब्लॉगरच्या टेम्प्लेटचे विविध प्रकार कोणते?-
ब्लॉगर टेम्प्लेटचे बरेच प्रकार आहेत. साधारणपणे ब्लॉगचा रंग, स्तंभ (Colomns) , आकार आणि रचना यावरुन ब्लॉग टेम्प्लेट्सचे प्रकार ठरवले जातात. माझ्या मते कॉलम्स (colomns - स्तंभ) ची संख्या हा ब्लॉग टेम्प्लेट्स निवडण्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे.
ब्लॉगरच्या टेम्प्लेट्स कोठे मिळवता येतील?
मोफत ब्लॉगर टेम्प्लेट्स उपल्ब्ध करुन देणार्या हजारो वेब साइट्स इंटरनेटवर उपल्ब्ध आहेत. गुगलसर्च केल्यास त्यांची यादीच समोर येइल. वाचकांसाठी मी पहील्या पाच साईट्सची (माझ्यामते) नावे सुचवीत आहे
-Mashable's Top 70 blogger templates
-http://www.eblogtemplates.com/
-Templates4all
-FreeTemplates
-http://btemplates.com/
आपल्या ब्लॉगसाठी सर्वोत्तम टेम्प्लेट कशी निवडावी?
- यासाठी ३क रुल लक्षात ठेवा. म्हणजेच कलर, कॉलम्स आणि कस्टमर. या तीन "क' चा विचार करुनच आपली टेम्प्लेट निवडा.
- जर तुम्ही अॅडसेन्स (जाहीराती) आणि इतर गॅजेट्स वापरणार असाल तर ३ कॉलम्स असलेली टेम्प्लेट वापरा.त्यामुळे तुमच्या ब्लॉग प्रोफेशनल वाटेल.
- जर ब्लॉग साधा आणि सोपा दिसावा असे वाटत असेल तर २ कॉलम्स असलेली टेम्प्लेट निवडा.
- पण १ कॉलम किंवा ४ कॉलम्स असलेली टेम्प्लेट शक्यतो निवडु नका.एका कॉलम मुळे ब्लॉग अगदीच साधा दीसेल आणि चार कॉलम्समुळे ब्लॉग एकदम किचकट दीसेल.
आता तुम्हाला टेम्प्लेट्स बद्दल बर्यापैकी माहीती झालेली आहे असे गृहीत धरुन, ब्लॉग टेम्प्लेट कशी बदलावी याबद्दल सांगतो.
1. पहील्यांदा तुम्हाला आवडलेली टेम्प्लेट इंटरनेटवरुन संगणकामध्ये डाउनलोड करुन घ्या.
2. डाउनलोड केलेली टेम्प्लेट .xml प्रकारची असेल. जर ती rar किंवा .zip प्रकारची असेल तर त्यातुन .xml फाइल वेगळी काढुन घ्या ( extract it to a folder, so that you can access .xml file in it)
3. आता ब्लॉगर्.कॉम वर जाउन लॉग्-इन करा.
4. आणि Layout > Edit HTML वर क्लिक करा
5. येथे browse and upload चा पर्याय दीसेल. (चित्र पहा)
6. Browse बटणाच्या सहाय्याने संगणकात जेथे टेम्प्लेट डाउनलोड केलेली आहे तेथे जाउन .xml फाइल
सीलेक्ट करा
7. आता Save बटण दाबुन तुम्ही केलेले बदल सीलेक्ट करा.
आता तुमचा ब्लॉग तुमच्या आवडत्या टेम्प्लेटने सजलेला दीसेल. Enjoy blogging.
Hello Bloggerfriends, With this article I am starting a new series of "blogger (Blogspot) how to's". I will try and explain everything about blogger blogs with the help of detailed tutorials. To start with, I had selected "How to change blogger templates?" as a topic for first article.
What is blog template?
A wikipedia definition- A blog template is a tool used to separate content from presentation in web design, and for mass-production of web documents. It is a basic component of a web template system. Blog templates can be used to set up any type of Blog. In its simplest sense, a web template operates similarly to a form letter for use in setting up a website.Blogger by default gives us a limited choice of default templates. This templates are known as "Classic templates" too. Classic templates comes with basic functionalities and pro-bloggers normally don't like to select classic template as it does not distinguish your blog from others.
But still if you like one of the classic blog template, here is how you can use it.
1. Log in to your blogger.com account
2. On the dashboard you can see an option of "Layout". Click on it.
3. In layout menu four sub menus will appear - Page Elements , Fonts and Colors, Edit HTML and choose new template
4. Click on "Choose new template"
5. Here you can see all available options of classic templates.
6. Select your favourite classic template and then click on "Save template" button.
7. Now you can see the new template applied to your blog. Let's come to the more interesting part of working with templates. Here we will see how a new template can be imported to blogger blog. Before going to the process of changing blogger templates, let us first find answers for following question -
Why do you need a different blogger template? - The answer is simple, I want my blog to look different and I want blog design to reflect the character of my blog. Also I want to add few advance functionalities and improve look and feel of my blog
What are the different types of blogger templates? - There are various types of blog templates available. Normally, blog templates are classified on the basis of colors used, colomns used in templates , different widths of templates and designs. If you will ask me, the basic criteria of classifying templates is the number of coloumns used in templates.
Where can I find blogger templates? You will find lot of websites and blogs offering free blog templates on internet. You just have to google for it. I am giving a list of my top five blogger template resources on internet.
-Mashable's Top 70 blogger templates
-http://www.eblogtemplates.com/
-Templates4all
-FreeTemplates
-http://btemplates.com/
How can I select one that best suits my blog? -
The key is to use 3C rule. Select a color scheme that matches best with the content,character and customers (readers) of the blog.
- You can select a 3 coloumn blog if you want to use adsense and ither fancy gadgets on your blog. Use of three colomn template also gives a professional look to your blog.
- If you want to keep it simple and plain then use 2 colomn template.
- I will suggest you not to opt for 1 colomn or 4 colomn templates. As they will give a too plain or too cluttered look to your blog.
Now you must have got a good idea about templates and I know you are eager to change template of your blog.
1. First select the template from internet and download it to your computer.
2. The downloaded template will be in .xml format. If it is .rar or .zip file then extract it to a folder, so that you can access .xml file in it.
3. Again go to blogger.com and sign in.
4. Click on Layout > Edit HTML
5. Here you will find an option to browse and upload template from your hard drive.
6. Browse to the location in your computer and upload a .xml template file.
7. Save your new template and visit blog.
You will find your dream blog design on your blog. Enjoy blogging.
khup chan ya mule aamchya sarkhya Web Design chi olkh nasnarya la sudha blog create karayla madat hoil
सलील सर,
तुम्ही दिलेल्या ब्लोग टिप्स व अड्सेन्स टिप्समुळे खुप फायदा झाला.
तुमच्याकडून आणखी टिप्स मिळ्तील अशी अपेक्षा आहे.
ध्न्यवाद
http://shashikantjadhav.blogspot.in