~ 1 Comment

How to change favicon in blogger?


[ MARATHI ].......
ब्लॉगर.कॉम वर तयार केलेल्या प्रत्येक ब्लॉगसोबत दोन गोष्टी सदैव असतात. एक म्हणजे ब्लॉगच्या वरच्या बाजुला असलेला नेव्हीगेशन बार (Navigation bar) आणि दुसरा म्हणजे ब्लॉगच्या URL सोबत असलेला ब्लॉगरचा छोटासा भगवा फेवीकॉन.
मागील एका लेखामध्ये नेव्हीगेशन बार ब्लॉगवरुन काढुन टाकण्याच्या पद्धतीबद्दल मी माहीती दीली होती. आज या लेखामध्ये आपण ब्लॉगरचा फेवीकॉन काढुन त्याजागी स्वतःचा फेवीकॉन कसा वापरायचा ते पाहुया.
ईंटरनेट ब्राउजरच्या एड्रेस बारमध्ये -Address Bar (यालाच URL बार असेही म्हणतात) ब्लॉग युआरएलच्या बाजुला असलेला छोटासा १६ * १६ पिक्सेलचा छोटासा लोगो म्हणजे फेवीकॉन. फेवीकॉन असलेला ब्लॉग इतर ब्लॉगपेक्षा वेगळा आणि उठुन दीसतो. तसेच फेवीकॉन हा ब्लॉगचा लोगो बनुन ब्लॉगला एक ओळख मिळवुन देतो. आणि फेवीकॉनचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे फेवरेट्स मध्ये ब्लॉगची युआरएल शोधणे सोपे होते.
फेवीकॉन कसा बनवावा?
फेवीकॉन म्हणजे अतीशय छोटासा १६*१६ पिक्सेलचा लोगो. असा लोगो बनवण्यासाठी एक फेवीकॉन जनरेटर टूल उपलब्ध आहे.
येथे आपला लोगो अपलोड करा (खाली कमेंटमध्ये लिहिल्यास मी तुम्हाला मोफत लोगो बनवुन देइन) आणि मग Create Icon या बटणावर क्लिक करुन फेवीकॉन बनवुन घ्या.
हा फेवीकॉन Googlepages किंवा Google sites वर अपलोड करुन त्याची वेब लिंक मिळवा. (ImageShack; PhotoBucket या साईटसवर देखील फेवीकॉन मोफत अपलोड करता येतो)
ब्लॉगरमध्ये फेवीकॉन कसा बदलावा?
  1. ब्लॉगर डॅशबोर्ड मध्ये Layout >Edit HTML येथे क्लिक करा.
  2. ब्लॉगच्या कोडमध्ये </head> हा टॅग शोधा
  3. आता खाली दीलेला कोड </head> या टॅगच्या खाली चिकटवा (Copy and paste)
<link href='http://salilchaudhary.googlepages.com/netbhetfavicon.ico' rel='shortcut icon' type='image/vnd.microsoft.icon' /> <link href='http://salilchaudhary.googlepages.com/netbhetfavicon.ico' rel='icon'/>
4. आता वरील कोडमधील लाल रंगात दीलेल्या दोनही लिंक्सच्या जागी ('http://salilchaudhary.googlepages.com/netbhetfavicon.ico') तुमच्या फेवीकॉनची वेबलिंक चिकटवा.
5. टेम्प्लेट सेव्ह करा.
आता संगणकावरच्या cookies डीलीट करा. (internet explorer > tools > options >history > delete cookies ) आणि पेज refresh करा.
(टीप - बहुतेक वेळा इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये फेवीकॉन दीसत नाही. ही इंटरनेट एक्स्प्लोरर मधील तांत्रीक चुक आहे मात्र मॉझीला, क्रोम आणि सफारी सारख्या इतर सर्व ब्राउजर्स मध्ये तुमचा फेवीकॉन दीसु लागेल)
मी देखील नुकताच नेटभेट साठी नविन फेवीकॉन बनवला आहे. तो कसा वाटला ते सांगायला विसरु नका!

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

1 Response to "How to change favicon in blogger?"

  1. gravatar
    Sagar Kokne 5 January 2011 at 03:05 Permalink

    फार छान माहिती आहे...
    मला माझ्या ब्लॉगसाठी एक ब्लॉग विड्जेट बनवायचे आहे.
    त्यात काही मदत करू शकाल का?

    सागर कोकणे
    sagarkokne_spk@yahoo.com

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख