Online ads for Indian websites !
[ MARATHI ].......
मराठी ब्लॉगर्स आणि वेबमास्टर्ससाठी ऑनलाइन पैसे कमावण्याचे काही उत्तम मार्ग.काही दिवसांपुर्वी एक ब्लॉग माझ्या पाहण्यात आला. त्या ब्लॉगचे नाव आहे इंकम डायरी.कॉम (incomediary.com). इंटरनेटवर आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉग द्वारे पैसे कमावणार्या उद्योजकांच्या मुलाखती, ब्लॉग डीझाइनिंग, वेबसाइट होस्टींग तसेच इंटरनेट वर पैसे कमावण्याचे उपाय सांगणारा हा ब्लॉग बनवला आहे मायकल डनलॉप नावाच्या २० वर्षीय युवकाने. मायकल तीन वेबसाईट्सचा मालक आहे , तो चालवत असलेल्या वेबसाईट्स त्याला भरपुर पैसे मिळवुन देतात. त्याचा retire at 21 हा ब्लॉग तर महीन्याला ५००० डॉलर्स (रुपये २,५०,०००) इतकी कमाई करतो.
मायकलच्याच शब्दात सांगायचे तर,
I am living the Internet Lifestyle which means I make money while I sleep and get to do what I want, when I want!incomediary.com या वेबसाईटवर त्याने सगळ्यात जास्त कमाई करर्या ३० सर्वश्रेष्ठ ब्लॉग्जची यादी बनविली आहे. त्यापैकी पहील्या पाच ब्लॉग्जचे मासिक उत्पन्न येथे देतो आहे.
मी इंटरनेट लाइफस्टाइल जगतोय म्हणजेच मी झोपलेलो असताना देखील पैसे कमावतो. आणि मला जेव्हा जेव्हा मला जे जे करावेसे वाटते ते ते करतो.
1 Techcrunch - Michael Arrington - $200,000
2 Mashable - Pete Cashmore - $180,000
3 Perez Hilton - Mario Lavandeira - $140,000
4 Gothamist - Jake Dobkin - $80,000
5 Timothy Sykes - Timothy Sykes - $80,000
काय, यांचे उत्पन्न बघुन डोळे विस्फारले ना? फक्त जाहीरातींद्वारे हे ब्लॉग्ज इतका पैसा कमवत आहेत. आणि जगभर इतर हजारो ब्लॉगर्स त्यांच्या ब्लॉग्जपासुन कमाई करत आहेत. मग तुम्हालाही (मराठी ब्लॉगर्स) ब्लॉगींगमधुन पैसे कमावण्याची इच्छा आहे ना?
------------------------------------------------------------------------------------------------
ब्लॉग्ज आणि वेबसाईटस वर जाहीराती देणार्या बर्याच कंपन्या अस्तीत्वात आहेत. जाहीरातदारांकडुन जाहीरातीं घेउन त्या ब्लॉग्जवर प्रकाशीत करण्याचे काम या वेबसाईट्स करतात. ऑनलईन जाहीरातींचे दोन मुख्य प्रकार आहेत -
Pay per click -
PPC या नावाने ओळखल्या जाणार्या या जाहीरात प्रकारामध्ये वेबसाईटवरील मजकुरास अनुसरुन जाहीराती दाखवील्या जातात. प्रत्येक पानागणीक किंवा मजकुरातील बदलाप्रमाणे या जाहीराती बदलत जातात. जेवढे जास्त लोक या जाहीराती पाहतील त्यानुसार आणि जेवढे लोक या जाहीरातींवर क्लिक करतील त्यानुसार अशा दोन प्रकारे प्रकाशकांना (ब्लॉगर्सना) पैसे दीले जातात. गुगल अॅडसेन्स (Google adsense) या क्षेत्रातील सर्वात लोकप्रीय पर्याय आहे.
Affiliate marketing -
दुसरा प्रकार Affiliate marketing चा आहे. या प्रकारामध्ये जाहीरातदारांच्या जाहीराती ब्लॉग्ज वर दाखवील्या जातात. ब्लॉगच्या वाचकांनी या जाहीरातींवर क्लिक केले आणि पुढे जाउन काही खरेदी केली तर त्या खरेदीच्या ५% ते ४०% इतके कमीशन त्या ब्लॉगला मिळते. मात्र ग्राहकाने खरेदी केली तरच!
------------------------------------------------------------------------------------------------
गुगलची अॅडसेन्स ही सेवा या क्षेत्रात सर्वात आघाडीवर आहे. मात्र जगभरातील फक्त १३ भाषांतील ब्लॉग्जपुरताच ही सेवा उपलब्ध आहे. आणि एकही भारतीय भाषेचा यात समावेष नाही आहे. म्हणुनच मराठी किंवा इतर भारतीय भाषांमधील ब्लॉग्जवर जाहीराती दीसत नाहीत. (आणि म्हणुनच नेटभेट मराठी सोबतच इंग्लीश मध्येसुद्धा लिहावी लागतेय !) या क्षेत्रातील इतर कंपन्यादेखील गुगलच्याच पावलांवर पाउल ठेवुन चालत असल्यामुळे नॉन्-इंग्लीश ब्लॉग्जसाठी PPC चा पर्याय बंदच झालाय.
दुसरा मार्ग आहे Affiliate marketing चा ! मात्र भारतीय भाषांकरीता यापैकी बरेच मार्ग बंद आहेत.
पण माझ्या ब्लॉगर मित्रहो , निराश होउ नका. मी तुमच्यासाठी काही खास उपाय शोधलेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या मराठी ब्लॉगपासुन पैसे कमाउ शकता. अर्थात कीती ते मी नाही सांगु शकत परंतु काहीतरी कमवायला सुरुवात होइल हे नक्की.
१. Affiliate marketing -
- dgmpro ही भारतीय प्रकाषकांसाठी एक अतीशय उत्तम साइट आहे. या साइटवरील सर्व जाहीरातदार भारतीय कंपन्या असल्यामुळे भारतीय भाषांमधील साऐट्स आणि ब्लॉग्ज स्वीकारले जातात. यामध्ये तुम्ही टेक्स्स्ट आणि इमेज अशा दोनही प्रकारच्या जाहीराती वापरु शकता.
- Widgetbucks ही खरेतर PPC आणि Affiliate marketing या दोनही प्रकारात मोडणारी साईट आहे. पीपीसी मध्ये कदाचीत अपेउव्हल मिळणे कठीण आहे मात्र तुम्ही रेफरल (Affiliate marketin) चा वापर करु शकता.
- ibibo.com ही अतीशय झपाट्याने वाढणारी भारतीय वेबसाइट आहे. इथे देखील भारतीय भाषांमधील साइट्सवर जाहीराती दील्या जातात. (अजुन नेटभेट मात्र येथे अप्रुव्ह झाली नाही !)
- Commission junction ही आणखी एक साइट. जर तुमच्या ब्लॉगवर येणार्या वाचकांची संख्या बर्यापैकी जास्त असेल आणि त्यापैकी अमेरीकन वाचक अधीक असतील तर तुमचा ब्लॉग येथे अप्रूव्ह होइल.
- shaadi.com ही साइट तर आपल्या ओळखीची आहेच. शादी.कॉम ची जाहीरात तुम्हाला आपल्या ब्लॉगवर लावता येइल. जर तुमच्या ब्लॉगवाचकाने या जाहीरातीवर क्लिक करुन शादी.कॉम वर मोफत रजीस्ट्रेशन केले तर त्यासाठी प्रत्येकी २५ रुपये देण्यात येतील आणि जर पैसे देउन नोंदणी केली तर त्यापैकी ४०% पैसे तुम्हाला मिळतील.
- co.cc - यापुर्वीच मी आपल्याला या अतीशय उपयोगी साईट बद्दल सांगीतले आहे. co.cc असे मोफत डोमेन नेम देणारी ही साईट प्रत्येक रेफरल साठी तुम्हाला पैसे देते. खालील जाहीरातीवर क्लिक करुन अधीक माहीती मिळवता येइल.
- Deposit files ही एक मोफत फाइल होस्टींग साईट आहे. तुम्ही अपलोड केलेल्या विविध डॉक्युमेंट्स च्या डाउनलोडींग वर तुम्हाला पैसे मिळतील. खालील लिंक वर क्लिक करुन डीपॉझीट फाइल्स च्या साईटवर जा.
- Docstoc ही एक मोफत डॉक्युमेंट होस्टींग साईट आहे. तुमच्या संगणकावर उपलब्ध असलेल्या डॉक्युमेंट्स (word, ppt, excel, pdf, text files) फाइल्स यावर अपलोड करुन ठेवा. आणि तुमचे गुगल अॅडसेन्स अकाउंट यासाइटशी संलग्न करुन घ्या. जेव्हा जेव्हा कोणी वाचक तुम्ही अपलोड केलेल्या फाइल्स डाउनलोड करेल तेव्हा तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.
मराठी ब्लॉगर्स जर पैसे कमाउ लागले तर अधीकाधीक लेखक ब्लॉगींगकडे आकॄष्ट होतील आणि अधीकाधीक चांगले मराठी साहीत्य ऑनलाइन उपलब्ध होइल. मराठी वाचकांची संख्या वाढत गेल्यास एक दिवस गुगल काका आपली दखल घेतीलच आणि PPC जाहीरातींचा मार्ग आपल्याला खुला होइल.
मी येथे दीलेले उपाय आपल्याला आवडतील अशी अपेक्षा आहे. याव्यतीरीक्त मी फक्त मराठी ब्लॉग्जसाठी मराठी जाहीराती असलेला प्रोग्राम सुरु करणार आहे. सध्या कच्चा मसुदा तयार असुन तो पुर्णत्वास येण्यासाठी थोडा वेळ लागेल. मात्र तुम्ही त्यामध्ये भाग घेउ इच्छीत असाल तर आजच येथे क्लिक करुन subscribe करा.
( येथे दीलेल्या साइट्सवर नोंदणी करताना काही मदतीची गरज भासल्यास येथे क्लिक करुन आपले प्रश्न मांडावेत. मी सर्वतोपरी आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करेन )