Top 10 Best Free Blogger Templates (Handpicked by me !)
ब्लॉगर (ब्लॉगस्पॉट्.कॉम) आणि वर्डप्रेस्.कॉम मध्ये मला नेहमीच वर्डप्रेस.कॉम आवडते आणि तरीही मी ब्लॉगर.कॉमचीच सेवा वापरतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ब्लॉगरने ब्लॉगवर जाहीराती दाखवीण्यासाठी पुरवीलेली अॅडसेन्स ही सुविधा. आणि आणखी एक कारण म्हणजे विवीध टेम्प्लेट्स वापरण्याची सोय.
ब्लॉगरसाठी अक्षरक्षः हजारो टेम्प्लेट्स उपलब्ध आहेत आणि ते देखील मोफत. गेल्या ८ महीन्यात मी ब्लॉगरसाठी उपलब्ध असलेल्या अनेक टेम्प्लेट्स पाहील्या, वापरल्या, कस्टमाइझ (बदलल्या) केल्या. अगदी मी ब्लॉगटेम्प्लेट्स बरोबर खेळलो असे म्हणायला हरकत नाही. आज मी माझ्या सर्व ब्लॉगर मित्रांसाठी आणि सर्व नविन ब्लॉगर्ससाठी मला (आतापर्यंत) आवडलेल्या सर्वोत्तम १० फ्री ब्लॉग टेम्प्लेट्स बद्दल सांगणार आहे. मला आशा आहे या अफलातुन ब्लॉग टेम्प्लेट्स तुम्हाला पहायला आणि वापरायला नक्कीच आवडतील.
पण त्यापुर्वी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की मी निवडलेल्या या दहा ब्लॉग टेम्प्लेट्स फक्त त्यांच्या डीझाइन्समुळे मला आवडलेल्या नाहीत तर त्यांची उपयुक्तता, ब्लॉग लोड होण्यासाठी लागणारा वेळ, विजेट्सची संख्या आणि मांडणी व सर्वात महत्त्वाचे SEO म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टीमायझेशनच्या दृष्टीने टेम्प्लेटची केलेली मांडणी यामुळे मला आवडलेल्या आहेत. यापेक्षा छान दीसणार्या अनेक ब्लॉग टेम्प्लेट्स अस्तीत्वात आहेत त्याबद्दल नंतर कधीतरी लिहेन !
1. माझी सर्वात आवडती ब्लॉग थीम म्हणजे झीनमॅग प्रायमस २.० (Zynmag Primus 2.0). ही एक मॅगझीन या प्रकारात मोडणारी थीम आहे. या थीममध्ये मुख्य किंवा पॉप्युलर ब्लॉग पोस्ट्सबद्दल माहीती देणारे फीरते बॅनर हेड समावीष्ट केले आहे. हे बॅनर हेडच झीनमॅगचे मुख्य वैशीष्ट्य आहे. (लवकरच नेटभेटवर या टेम्प्लेटचा वापर केलेला दीसेल !)
3. WP-Polaroid - ही ब्लॉग टेम्प्लेट मुळात वर्डप्रेससाठी बनवण्यात आली होती त्यानंतर ब्लॉगरसाठी परीवर्तीत करण्यात आली.
4. Ads Theme - अॅड्स थीम ही मुख्यत्वे गुगल अॅडसेन्सला लक्षात ठेवुन बनवण्यात आलेली आहे. "नेटभेट" साठी मी हीच थीम वापरलेली आहे (अर्थात मी या थीममध्ये केलेल्या बदलांमुळे हे ओळखु येत नाही !)
5. Magazeen
6. Dreamy (From my Favourite Template Designer Dante)
7. Zinmag Futura
8. Greenary Template
10. Rainbow