संगणकावर मराठीत कसे लिहायचे ?
मराठी मध्ये वाचण्यासाठी आता बरेच पर्याय उपल्ब्ध आहेत. विविध वेबसाइट्स आणि मराठी ब्लॉग्ज आता नेट वर दिसु लागले आहेत. ही झाली वाचनाची सोय. पण मला ठाउक आहे की सुजाण वाचकांना आता पुढे मराठीत लिहिण्याची गरजही भासु लागली आहे. मित्रहो आजचा आपला लेख याच विषयावर आहे.
मराठीत कसे लिहायचे? (How to write in Marathi?) इंटरनेटवर बरीच मुशाफीरी करुन मी मराठीत लिहिण्याचे पाच उत्तम पर्याय शोधुन काढले आहेत. (हा लेख मी यापैकीच एका पर्यायाचा वापर करुन लिहित आहे!) यापैकी काही सॉफ्टवेअर आहेत जे आधी डाउनलोड करुन इन्स्टॉल करावे लागतात तर काही वेब अप्लिकेशन्स (Web applications) आहेत. web applications म्हणजे असे प्रोग्राम्स जे इंटरनेट वर वापरता येतात. काहीही डाउनलोड अथवा इन्स्टॉल करण्याची गरज नाही.
१. गुगल इंडीक ट्रान्सलिटरेशन (Google Indic Transliteration)
इथे सुद्धा गुगल काकांनीच बाजी मारली आहे.गुगल चे हे वेब अप्लिकेशन www.google.co.in > More >labs > indic transliteration येथे उपल्ब्ध आहे.
खरेतर इथे मराठीत लिहिण्याची सोय नसुन हींदी मध्ये लिहिण्याची आहे मात्र दोन्ही भाषांची लिपी (Script) एकच असल्याने मराठी देखिल उत्तम लिहिता येते. ट्रान्सलिटरेशन हा शब्द माझ्यामते गुगलचीच उपज आहे. ट्रान्सलेशन (Translation) या शब्दावरुन ट्रान्सलिटरेशनची व्युत्पत्ती झाली आहे.ट्रान्सलिटरेशन म्हणजे शब्दाच्या उच्चारावरुन इंग्रजी मध्ये स्पेलिंग लिहायची, स्पेसबार दाबायचा की आपोआप त्या स्पेलिंगचे मराठीत रुपांतर होते. उदाहरणार्थ - mee असे टाइप केल्यास "मी" असे स्क्रीनवर दिसेल. समजले का?
आणखी काही उदाहरणे पाहु -
Salil - सलिल , netbhet - नेटभेट , marathi - मराठी
गुगल इंडीक ट्रान्सलिटरेशनचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे जरी स्पेलिंग चुकली असेल तरी गुगल स्वतः शब्दसंग्रहातून उचीत शब्द निवडून आपोआप स्क्रीन वर दाखवते.
बघा वापरुन, एकदम भन्नाट आहे हे गुगल इंडीक ट्रान्सलिटरेशन !
२. www.quillpad.com - क्वीलपॅड
हे एक गुगल इंडीक ट्रान्सलिटरेशन सारखेच टूल आहे मात्र गुगल प्रमाणे स्वतःहुन उचीत शब्द शोधण्याची सोय यात नाही आहे. मात्र ऑनलाइन अप्लिकेशन असल्यामुळे क्वीलपॅड खुप उपयोगी आहे.
३. www.baraha.com - बराहा -
बराहा हे मराठीत आणि इतर भारतीय भाषांमध्ये लिहिण्यासाठी उत्तम सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध आहे. मात्र ते डाउनलोड करुन घ्यावे लागते. बराहा सॉफ्ट्वेअर वापरण्यास खुप सोपे आहे. मराठीतील शब्द लिहिण्यासाठी तत्सम इंग्लीश अक्षरांचा अतीशय हुशारीने वापर केला आहे. त्यामुळे मराठी लिहिण्यासाठी हे सॉफ्ट्वेअर अतीशय उपयुक्त आहे.
४. www.gamabhana.com -
गमभन.कॉम या साइटवर उपलब्ध असलेले गमभन हे सॉफ्टवेअर हे मराठीतून लिहिण्यासाठी माझे सर्वात आवडते सॉफ्टवेअर आहे. हे आकाराने लहान असलेले सॉफ्टवेअर डाउनलोड करुन घ्यावे लागते, मात्र इन्स्टॉल न करता वापरता येते.
HTML आणि इतर फॉरमॅटींग च्या सुविधा या सॉफ्टवेअरच्या जमेच्या बाजु आहेत. वरील सर्वच पर्याय ट्रान्सलिटरेशनचा वापर करतात. आणि खरे सांगतो मित्रहो, इंग्रजी अक्षरे टाइप करुन स्क्रीनवर मराठी अक्षरे बघण्याचा आनंद काही औरच असतो.
घ्या मग आनंद मराठीत लिहिण्याचा. आणि हो तुमचे अनुभव मला कळवण्यास (मराठीत !) विसरु नका.
inscript कीबोर्ड असणारे software वेब वर उपलब्ध नाही का? मला त्याची सवय असल्याने ते वापरणे सोयीचे ठरेल. http://nathtel.blogspot.com
what an idea sir ji.
I always felt it a little difficult to write in marathi,though wished strongly.
now I ve a handy google transliterater.
Thanks a million.
How to show "MARATHI TEXT" IN HTML?
मराठीत लिहिण्यासाठी Microsoft Indic हे टूल फारच उपयुक्त आहे .
डाऊनलोड करून setup करा . आणि Alt + Shift दाबून भाषा बदला ..आणि पहा गम्मत ..
महत्वाचे म्हणजे हे टूल ऑफलाइन सुद्धा वापरता येते ....अगदी कोणत्याही टेक्स्ट बॉक्स मध्ये कर्सर ठेवा आणि भाषा बदला ... लिहा .....मज्जा मज्जा मज्जा !!!!!!!!!!!!!!!!!!!
http://www.bhashaindia.com/ilit/Marathi.aspx
thanks....this will help a lot
pan blog kothe lihaycha??
मी आय.एम.ई. हे टूल वापरत असून मला वा*यावर (Varyavar) हा शब्द लिहायचा आहे. उपाय सांगा.
google transliterater हे सर्वात सुटसुटीत व वापरण्यासाठी योग्य असे माध्यम आहे.
मी माझे ब्लोग्स व सर्व लेख यावरच लिहितो. कमी वेळात व तंत्रशुध्द लिहण्यासाठी याचा अप्रतिम वापर होतो.
google transliterater हे सर्वात सुटसुटीत व वापरण्यासाठी योग्य असे माध्यम आहे.
मी माझे ब्लोग्स व सर्व लेख यावरच लिहितो. कमी वेळात व तंत्रशुध्द लिहण्यासाठी याचा अप्रतिम वापर होतो.
Blog kasa lihava tyache tantra kay hyachyach shodhat hoto aani
netbhet.com chya rupane gurukillich hati aali. Shatshaha dhanyawad.
मी google input tools वापरत आहे.ब्लॉग लिहिण्यास हे tool काम करेल का?
ya
वर्सी अंगारकी चतुर्थी नाही
chan mahiti