मराठी ब्लॉगर्स, स्नेह मेळावा - मुंबई
ब्लॉगर दोस्तांनो,
पुणे येथे यशस्वीरित्या संपन्न झालेल्या पहिल्या ब्लॉगर मेळाव्यानंतर दुसरा ब्लॉगर मेळावा तुमच्या, आमच्या, सर्वांच्या - आपली मुंबई येथे आयोजित होतो आहे. रविवार, दिनांक ९ मे २०१० रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळात हा ब्लॉगर मेळावा संपन्न होईल. एकमेकांशी ओळख करून घेऊन स्नेहबंध आणखी घट्ट करावे या उद्देशाने हा ब्लॉगर मेळावा आयोजित होतो आहे. केवळ प्रस्थापित ब्लॉगर्सच नव्हेत तर ज्यांना मराठी ब्लॉग सुरू करायची इच्छा आहे अशा भावी मराठी ब्लॉगर्सचे व ब्लॉग वाचकांचेही या मेळाव्यात स्वागत आहे.
मुंबईच्या कानाकोपर्यातून व मुंबईबाहेरूनही ब्लॉगर्स/वाचक उपस्थित राहतील असे गृहीत धरून भेटीसाठी दादर, मुंबई हे मध्यवर्ती ठिकाण निवडले आहे. आपली उपस्थिती मोठ्या संख्येने नोंदवून आपण हा ब्लॉगर मेळावादेखील यशस्वी कराल याची खात्री आहे.
आपल्या उपस्थिती संख्येनुसारच भेटीचे नेमके स्थळ निश्चित करता येईल. आपल्या उपस्थितीची संमती म्हणून इच्छुक ब्लॉगर्स/वाचकांनी या पोस्टखालील प्रतिक्रियांमधे आपले नाव, ब्लॉगचे नाव (वाचक अथवा भावी ब्लॉगर असल्यास ब्लॉगचे नाव आवश्यक नाही), संपर्कासाठी ईमेल पत्ता द्यावा. कृपया नोंद घ्यावी: नाव नोंदणीची अंतिम तारिख ७ एप्रिल २०१० आहे.
या नाव नोंदणीसाठी एक गुगल डॉकही तयार करण्यात आले आहे. http://spreadsheets.google.com/ccc?key=0AlwmOqlYyppgdGxuaTdNY1JEZXZ6c3VDVDM4ZU1NeGc&hl=en हा त्या डॉकचा दुवा आहे. येथेदेखील नाव नोंदणी करता येईल.
वाचक अथवा भावी ब्लॉगर (http://www.mogaraafulalaa.com/2010/03/blog-post_29.html) ही लिंक आपल्या ईमेलमधून आपल्या स्नेह्यांना पाठवू शकतील.
आपल्या शंका, सूचना व सल्ले खालील ईमेल पत्त्यावर अवश्य पाठवा:
रोहन चौधरी - chaudhari.rohan@gmail.com
महेंद्र कुलकर्णी - kbmahendra@gmail.com
कांचन कराई – mogaraafulalaa@gmail.com