~ 1 Comment

Fun Orkut Scraps


ब्लॉगचे नाव
Fun Orkut Scraps
नाव Amit
आडनावDhanji
ब्लॉग लिंकwww.funorkutscraps.com
ब्लॉगचे विषयकविता (Poetry)  
ब्लॉगचे विषयकला (Arts) 
ब्लॉगचे विषय     
ब्लॉगचे विषय
शहरkalyan
देशindia
ब्लॉगबद्दल माहिती
"माझ्या माय बोलीच्या तान्ह्यांनो तुम्हा सर्वाना आमचा मानाचा मुजरा.
माझ्या मातीच्या भाषेला पौढी मिळविण्यासाठी अगदी संत महंतापासून महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात सामावलेल्या साहित्यिकापर्यंत सर्वानीच आयुष्य वेचले. ज्या मायबोलीचे स्तनपान करून आपण जाणते झालो आज त्या माउलीच्‍या चेहर्‍यावर वाध्यक्याच्या सूरकुत्या दिसु लागल्या आहेत. प्रत्येकजण आपल्या स्वप्नाच्या आकाशात भरारी मारताना आपल्या मायबोलीस मात्र विसरला आहे. खरे आहे कारण प्रेम व्यक्‍त करण्यासाठी उर्दू, व्यापार वाढविण्यासाठी इंग्रजी, व्यवहारासाठी हिंदी आणि केवळ वाद घालण्यासाठी मराठी? अशी काहीशी प्रथा सुरू आहे.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरे धन्य एक तो मराठी |
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी |
या कविवर्य सुरेश भटांच्या भावना कवितेतून उफाळुन आल्या आहेत, पण आपण मात्र भावनाशून्य झाल्यासारखे भासतो. आदय सिनेउद्योगपती भारतीय सिनेसृष्टीचे जनक कै.दादासाहेब फाळके यांनी भारतातील पहिला सिनेमा मराठी भाषेत निर्माण करुन माझ्या मायबोलीच्या शिरावर मनाचा मुकुट चढविला, पण मध्यंतरी त्याची चमकही नाहीसी होताना दिसत होती. आज मात्र परिस्थिती बदलताना दिसत आहे. मराठी सिनेमा मराठी संगीत यांना सुगीचे दिवस आले असे वाटते.
आम्ही त्याच माउलीची बाळे तिचे पांग फेडण्यास www.funorkutscraps.com या संकेतस्थळाचा साजरा हट्टाहास करीत आहोत, या संकेतस्थळावर आम्ही आपणासाठी मराठी भाषेतील औपचारिक शुभेच्छापत्रे, साहित्यातील नऊ रसांच्या कविता, चारोळ्या, थोर पुरुषांचे विचार, विविध क्षेत्रातील मराठी तार तारकांचे संशी संशिप्थ माहितीसत्र तसेच दिन विशेष इत्यादींचा समावेश केला आहे. आपल्याहि साहीत्यांचे या संकेतस्थळावर प्रसिध्दिसाठी स्वागत आहे. आपन आपले साहित्य saad@funorkutscraps.com या ओळखस्थळावर पाठवू शकता. आपल्या प्रतिक्रिया आमच्या खारीच्या धडपडीस नव चैतन्य ठरतील. माझ्या मायबोलीची ख्याती महाराष्ट्रातच नवे तर सार्‍याविश्वात व्हावी हा एकच ध्यास जागविताना आपण आपल्या प्रतिक्रिया मनसोक्त शब्दरूपी प्रतिसाद देऊन आम्हास धन्य करावे. "
ईमेल पत्ता (Email id)saad@funorkutscraps.com
ब्लॉगची वाचकसंख्या (प्रतीमहिना)1000 to 5000 Page Views

1 Response to "Fun Orkut Scraps"

  1. gravatar
    Mayur 29 May 2011 at 05:54 Permalink

    kup Sundar ahe he Website

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख