ब्लॉगबद्दल माहिती | मी मलाच शोधत आहे. बाहेर शोधले मग आत डोकावून पाहीले. मला शोधता शोधता इतरांना वाचण्याचा छंद जडला. माणसाच्या आत प्रत्तेकाचे असे एक जग असते ते सापडू लागले. माणसांची खोली जाणवली तसा उथळपणाही, मनाचा मोठेपणा जाणवला तसा कोडगेपणाही. पण एक मात्र सत्य सापडले की प्रत्येकाचे जग आतून वेगळेच आहे. कधी ते त्याच्या आसपासच्या जगाचाच एक भाग असतं तर कधी त्याचं आतलं जग हे त्याच्या आसपासच्या जगाला परीपूरक असते विरूध्दअर्थी असतं. जीवनातील विसंगती शोधन्यातच मला जास्त रस वाटतो. वैविध्यता व अराजकता यातच जीवनाचे रहस्य असते असं मला वाटते. भले मी सर्वत्र विसंगत असेन पण मी आहे. बीजगणितातल्या आकड्यासारखा मी असा ठोक नाही. २+२=४ असे माझ्याबाबतीत नेहमी खरे होईल असे नाही. निरंतर बदल हाच खरा जीवन सिध्दांत आहे असं मला वाटतं. |