ब्लॉगबद्दल माहिती |
सह्यभटकंतीचे एकदा वेड लागले कि
मग काही विचारायलाच नको आठवड्याचे शनिवार-रविवार जसे जवळ येतात तसे मग
प्रत्येकाच्या डोक्यात विचार चालू होतात ते सह्याद्रीतील भटकंतीचे. प्रत्येक
वेळेस नवीन-नवीन ठिकाणांचा शोध घेऊन निसर्गाचा आनंद मिळवणे आणि इतिहासात हरवून
जाणे यासारखे दुसरे सुख नाही. अश्याच आडवाटांवर निसर्गात फिरल्यावर आपल्याला
जाणवते कि या निसर्गात आपण किती सूक्ष्म आहोत. अश्याच अनवट वाटांवर असणारे अनगड
किल्ले, सह्याद्रीतील छोटी छोटी गावे, आडरानातील आखीव-रेखीव मंदिरे,
सह्याद्रीच्या कुशीतील छोटे-मोठे तलाव, आणि सह्याद्रीच्या काळ्या कातळात
खोदलेल्या सुंदर लेण्या आणि कोरीव गीरीशिल्पे ही आडरानात भटकून त्याची माहिती
मिळवणे यातली मजा काही औरच असते. हीच सगळी माहिती अभ्यास अरुण आणि छायाचित्र
टिपून सर्वांसमोर सादर करायचा प्रयत्न...!!! |