~ 0 Comments

शिवाजीराव आढळराव पाटील---घराघरात, मनामनात एकच नाव…

नाव शिवाजीराव आढळराव पाटील
ब्लॉग लिंक http://shivajiraoadhalrao.wordpress.com/
शहर पुणे
देश भारत
ब्लॉगचे विषय लेख (Articles)
ब्लॉगचे विषय राजकारण (Politics)
ब्लॉगचे विषय माहिती (Information)
ब्लॉगचे विषय महाराष्ट्र (Maharashtra)
ब्लॉगबद्दल  माहिती नमस्कार…

जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या आणि सर्वत्र गुण्यागोविंदानं नांदणाऱ्या सर्व मराठी भाषक बंधू-भगिनींना माझा सप्रेम दंडवत…

खूप दिवसांपासून लिहीन लिहीन असं मनात होतं. पण त्याला मुहूर्त सापडत नव्हता.अनेकदा छोट्या छोट्या गोष्टी असतात किंवा काही महत्त्वाच्या घडामोडी असतात. त्या तुमच्याशी ‘शेअर’ कराव्याशा वाटतात. वृत्तपत्रांमधून या ना त्या निमित्तानं आपली भेट होत असते. पण त्यालाही मर्यादा पडतात. त्यामुळंच एका वेगळ्या माध्यमातून तुमच्याशी बोलावं, असं अनेक दिवस मनात घोळत होतं. अखेरीस आता त्याला मूर्त रुप आलंय.निरनिराळ्या व्यापातून अखेर वेळ काढला असून यापुढेही नियमितणे वेळ काढणार आणि लिहित राहणार,हे पक्क ठरवलंय. आणि हो, ‘ब्लॉग’साठी निमित्त निवडणुकीचं असलं तरीही प्रचारासाठीब्लॉग लेखन नाही. राजकारण असेलही पण चवीपुरतं.

मग तुम्ही म्हणाल, राजकारणी माणूस राजकारणावर लिहिणार नाही, मग हा ब्लॉग आहे कशासाठी? या ब्लॉगमध्येराजकारणावर लेखन असेल. पण फक्त चवीपुरतं.उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं जगभर प्रवास करताना अनेक गमतीदार गोष्टी समजतात. ‍वेगळीच माहिती पुढं येते. राजकारणात आल्यापास्नं अनेक वेगवेगळेअनुभव मिळतात. गावातनं फिरत असताना एखादी मायमाऊली ‘शिवाजी, लय मोठा झालास रं तू. असाच आणखी मोठा हो,’ असं म्हणत आशीर्वाद देऊन टाकते. तरुण मंडळी भेटतात आणि ‘दादा, तुमचा अभिमान वाटतो. आम्हालाही तुमच्यासारखं करियर करायचंय,’ असं सांगतात. असं काही ऐकतो, तेव्हा मलाही थोडंसं भरून येतं आणि स्वतःवरील जबाबदारीची जाणीव होते. संसदेत नुकत्याच घडलेल्या रणकंदनानंतर प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून तातडीनं ‘रिअॅक्ट’ व्हावंसं वाटतं. क्वचित कधीतरी जुन्या आठवणींचा कप्पा अलगद उघडावासा वाटतो. मन मोकळं करावंसं वाटतं. हे सगळं करण्यासाठी हा ब्लॉग असेल.

गंमत पहा. परिस्थिती कशी बदलत जाते. पूर्वी नुसतं साक्षर असून भागायचं. नंतरच्या काळात संगणक साक्षरता आवश्यक भासू लागली. आताच्या जमान्यातफक्त संगणक साक्षर असून उपयोग नाही. ‘सोशल नेटवर्किंग’वर तुमचा वावर असणं अत्यावश्यक भासू लागलंय.कारण एका ‘क्लिक’च्या जोरावर जगभरात पसरलेल्या कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचणं, हे सोशल मिडियामुळंच शक्य झालंय. अगदी आपल्या लांडेवाडीपासून ते ब्रिटनमधील लंडनपर्यंत आणि शिक्रापूरपासून ते अमेरिकेतल्या शिकागोपर्यंत एकाचवेळी अनेकांशी पोहोचणं सहज शक्य आहे. हा सोशल मिडियाचा आणखी एक फायदा. तुमच्या माझ्यात संवाद आहेच. गाठीभेटीही नियमितपणे होतच असतात. दौरेही असतातच. मात्र, हा संवाद आणखी सहज, सोपा आणि नियमितपणे व्हावा, यासाठीच ‘ब्लॉग’ या माध्यमाचा उपयोग करण्याचं निश्चित केलंय.

मुळात संगणक आणि तंत्रज्ञान या गोष्टी मला नवीन नाहीत. त्यांची भीती वगैरे तर कधीच वाटली नाही.इतर मंडळी त्यापासून चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करीत होती, तेव्हापासून मी संगणकाशी दोस्ती केलीय. १९८२ साली जेव्हा ‘डायनॉलॉग’ सुरू केली तेव्हापासून इन्फॉर्मेशन-टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर या गोष्टींशी माझा संबंध आहे. अनेकदा इंजीनिअर मंडळींना देखील मी वेगळ्या पद्धतीनं ‘सर्किट डिझाईन’ करण्याबाबत सुचवायचो. त्यामुळं माझी आणि टेक्नॉलॉजीची गट्टी खूप आधीपासनं जमलीय. ट्वीटर आणि फेसबुकवरही अनेक वर्षांपासून सक्रिय आहे.‘शिवाजीराव आढळराव पाटील’ फेसबुक पेजला ७० हजारांच्या आसपास चाहत्यांनी ‘लाईक’ केलंय. ‘ब्लॉग’च्या निमित्तानं पुन्हा एकदा माझे नि टेक्नॉलॉजीचे सूर जुळून येणार आहेत.

‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे…’ असे समर्थ रामदास यांनी म्हटले आहे.तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी ‘लिहिता होणार’ आहे आणि नियमित लिहिता राहणार आहे. तेव्हा भेटतच राहू.
ईमेल पत्ता  (Email id) shivajirao.a.patil8556@gmail.com
ब्लॉगची वाचकसंख्या ( प्रतीमहिना ) 5000 to 10000 Page Views

Leave a Reply

My Blog List

ब्लॉगजगतात नुकतेच प्रकाशित झालेले लेख